मुंबई | मुंबईतील घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना घडली आहे. घाटकोपरच्या सर्वोदय रूग्णालयाजवळ विमान कोसळले आहे. उत्तरप्रदेश सरकारचे व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी ९० विमान असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या विमानातील सर्व प्रवासी जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.
सदर विमान कोसळल्याने मोठा स्फोट झाला असून आगीचे मोठे लोळ येत आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस घटनास्थळी पोहचले असून अग्निशमन दलाच्य़ा सहा गाड्या देखील दाखल झाल्या आहेत.
#WATCH: A chartered plane crashes near Jagruti building in Ghatkopar where a construction work was going on. #Mumbai pic.twitter.com/ACyGYymydX
— ANI (@ANI) June 28, 2018
घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात स्फोट झाल्याची माहिती समजते आहे. या दुर्घटनेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या स्फोटाने आगीचे मोठे लोळ पसरले असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.