HW News Marathi
मुंबई

स्टॅंडहर्स्ट रोड स्टेशन जवळ रुळावर भिंत कोसळली

मुंबई | मुंबईतील स्टॅंडहर्स्ट रोड स्टेशन जवळ रुळावर भिंत कोसळली आहे. धिम्या रेल्वे रुळावर ही भिंत कोसळली आहे. भिंत कोसळल्यामुळे धिम्या गतीची वाहतूक ठप्प झाली असून भिंत पडल्यामुळे धीमी वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली आल्यामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. मुंबई तसेच उपनगरात जोरदार पाऊस सुरू असून नालासोपारा, वसई, कळवा, ठाणे, मुंब्रा येथील रेल्वे रुळामध्ये पाणी साचले आहे. लोकल तसेच रस्ते वाहतूकीवरही पावसामुळे परिणाम झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अर्धवट तथ्य’ असलेल्या गोष्टी सांगू नका किंवा काँग्रेस पक्षा सोडा !

swarit

बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलिसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे

Aprna

अंधेरी पोटनिवडणुकीतील नाराजीच्या चर्चांवर काँग्रेसची प्रतिक्रिया

Manasi Devkar