HW News Marathi
मुंबई

सभागृहात असे कधीच घडले नाही

मुंबई | विधानसभेत कामकाज करत असताना सध्या जो कारभार सुरू आहे, तो यापूर्वी कधीच पाहिला नसल्याची खंत शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी विधानसभेत व्यक्त केली. विधिमंडळाचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात कोणालाच कसलेही गांभीर्य राहिले नसल्याचे दिसते. आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तरे देण्यासाठी कॅबिनेट मंत्री उपस्थित राहत नाहीत. सभागृहात अशी परिस्थिती कधीच नसल्याचे गणपतराव देशमुख यांनी सभागृहात सांगितले. गणपतराव देशमुख हे राज्याच्या विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सभासद असून ११ वेळा ते निवडून आलेले आहेत. दरम्यान, अनुपस्थित राहण्याऱ्या मंत्र्यांनी तंबी दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

  • सभागृहाचे गांभीर्य गेले

सभागृहाचे गांभीर्य राहिले नसल्याची खंत सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांनी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहातील कामकाजावर नाराजी व्यक्त केली. विधिमंडळामध्ये जे कामकाज सुरू आहे या कामकाजात कोणतेच गांभीर्य़ राहिले नसल्याचे जाणवत असल्याचे सांगितले.

  • सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही लक्ष द्यावे

विधिमंडळात कामकाज सुरू असतांना सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही गांभीर्याने सभागृहात उपस्थित राहणे आवश्यक असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अजित पवार यांच्यासह खूद्द मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केले. विरोधी पक्षातील आमदार हे प्रश्न विचारात आणि मंत्री हे उत्तर देत असतांना विरोधी पक्षातील आमदार उत्तर ऐकायला नसतात ही परिस्थिती देखील चांगली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

  • उत्तरे न देणाऱ्या विभागावर कारवाई

लक्षवेधी प्रश्नावर लेखी उत्तरे दिली जात नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांनी केली. यावेळी सबळ कारणाशिवाय जर उत्तर द्यायला उशीर झाला असेल त्या विभागावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

  • मागील अनेक वर्षांत असे कधी घडले नाही

विधानसभेच्या कामकाजात मागील अनेक वर्षात अशी परिस्थिती कधीही न्हवती. सभागृहातील गांभीर्य निघून गेले असून सगळ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देतांना कॅबिनेट मंत्री उपस्थित नसतात .प्रश्ना ची योग्य उत्तर दिली जात नाहीत . सभागृह हे गांभीर्याने चालत नसून हे असं कधीच पाहिले नसल्याची खंत व्यक्त केली .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेने महापालिकेवर फोडले खापर

swarit

ऊसतोडणी माथाडी बोर्डाची अंमलबजावणी चालू हंगामापासून करा. – सिटू व शेतमजूर युनियनची मागणी

News Desk

महापालिकेविरोधात त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा !

News Desk