HW News Marathi
मुंबई

काळाचौकीत डिजनीलॅण्ड नंतर यंदा छोटा भीम अवतरणार

मुंबई | मुंबई मधील प्रसिद्ध मंडळांपैकी असलेल्या काळाचौकीच्या महागणपतीसाठी गतवर्षी डिजनीलॅण्ड हे भव्य दिव्य आकर्षण गणेश भक्तांसाठी करण्यात आले होते. म्हणून यंदा उत्सुकता वाढली असेल तर, यंदा काळाचौतिच्या महागणपतीच्या छोटा भीम हे खास आकर्षण असणार आहे.

यंदा ६३ व्या वर्षात दणक्यात पदार्पण करणारे काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ यंदाही गणेशोत्सव काळात लहानग्यांसाठी नवीन संकल्पना राबविणार आहे. छोटा भीम आणि त्याच्या सवंगड्यांना बच्चे कंपनीच्या मनोरंजनासाठी काळाचौकी नगरीत अवतरवण्यात येणार आहे. हा देखावा मंडळाचे अध्यक्ष विजय लिपारे आणि सेक्रेटरी शेखर साळवी यांच्या संकल्पनेतून आला आहे. काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ दरवर्षी पाटपूजन सोहळ्यासह महागणपतीचे आगमन, विसर्जन पारंपारिक पध्दतीत साजरा करते. तसेच गणेशोत्सव काळात मुलांसाठी वेगवेगळ्या संकल्पनाही राबवते. याआधीही मंडळाने टेम्पल रन, जंगल बुक आणि डिजनीलॅण्ड अशा संकल्पना राबविल्या आहेत.

दिवंगत मुर्तीकार विजय खातू यांच्या कारखान्यातून घडवलेली, भक्तांना मोहात टाकणारी भव्य अशी महागणपतीची मुर्ती आणि त्याभोवती केलेल्या सजावटीला गणेश भक्तांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच या मंडळाला अनेक उत्कृष्ट पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यंदाही मंडळाने लहान मुलांचे मनोरंजन करण्यासाठी ‘छोटा भीम आणि त्याचे सवंगडी’ हा देखावा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक ज्ञानेश्वर शेलार हे या देखाव्याची सजावट करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्वातंत्रवीर सावरकरांसाठी सावरकरभक्तांचे उपोषण

News Desk

मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत

News Desk

मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर एसी डकमध्ये लागली आग

swarit
राजकारण

‘अमित शहा त्यांचे नाव कधी बदलणार ?’

Gauri Tilekar

हैदराबाद | ‘भाजप अध्यक्ष अमित शहा त्यांचे स्वत:चे नाव कधी बदलणार ?’, असा प्रश्न एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. “शहा हा मूळ शब्द फारशी भाषेत आहे. देशातील अनेक शहरांची, जिल्ह्यांची नावे बदलण्यासाठी उत्सुक असणाऱ्या भाजपने आधी त्यांच्या अध्यक्षांचे नाव बदलावे, असे ज्येष्ठ इतिहासकार इरफान हबीब यांनी म्हटले होते. हबीब यांच्या या वक्तव्यानंतर ओवेसी यांनी अमित शहांवर टीका केली आहे. ‘उत्तर प्रदेशामधील अनेक शहरांची नावे बदलण्यात येत आहेत. शाह हा शब्द फारशी भाषेतून आला आहे. मग आता अमित शहा त्यांचे स्वत:चे नाव कधी बदलणार ?,’ असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.

Related posts

‘या’ कारणामुळे जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन

Aprna

होय मी बंडखोर !

News Desk

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही! – उद्धव ठाकरे

Aprna