HW News Marathi
मुंबई

यंदाचा मुंबई श्री किताब परेळच्या अनिल बीलावाने पटकावला

मुंबई | गोरेगाव पूर्व येथील पांडुरंगवाडी मैदानात रंगलेल्या नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत परेळच्या हर्क्युलस जिमच्या अनिल बिलावा याने किताबावर आपले नाव कोरले आहे. या परेळच्या अनिल बिलावा याने शरीरसौष्ठव स्पर्धेचा कुठलाही अनुभव नसताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत नुकत्याच झालेल्या स्पर्धेत नवोदित मुंबई श्री किताब पटकावला. त्याचप्रमाणे, परब फिटनेस संघाच्या महम्मद हुसेन खान याने उत्कृष्ट पोझरचा मान मिळवला. विशेष म्हणजे एकूण ७ वजनी गटांतील ही स्पर्धा अत्यंत अटीतटीची झाली आणि प्रत्येक गटामध्ये कंपेरिझन केल्यानंतर गटविजेत्याची निवड करण्यात आली.

गटनिहाय विजेता निकाल

५५ किलो वजनी गट – १. हेमंत भंडारी (बॉडी वर्कशॉप), २. नितेश कोळेकर (परब फिटनेस), ३. संजय आंग्रे (राहुल).

६० किलो – १. विपुल सावंत (बॉडी वर्कशॉप), २. महेश कांबळे (गुरूदत्त), ३. सुमीत यादव (बॉडी वर्कशॉप).

६५ किलो : १. रूपेश चव्हाण (एलटी फिटनेस), २. अभिषेक पाटील (गुरूदत्त), ३. सलीम शेख (बॉडी वर्कशॉप).

७० किलो – १. मकरंद दहिबावकर (किट्टी जिम), २. शेख कादर बादशाह (गुरूदत्त), ३. सुनील गुरव (वेट हाउस).

७५ किलो – १. अनिल बिलावा (हर्क्युलस जिम), २. महम्मद हुसेन खान (परब), ३. हेमंत कंचावडे (फॉर्च्युन फिटनेस).

स्पर्धेचा निकाल

नवोदित मुंबई श्री – अनिल बिलावा

उत्कृष्ट पोझर – महम्मद हुसेन खान

गोरेगाव पूर्वेकडील पांडुरंग वाडीच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत सहभागी सर्व शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या पीळदार शरीरयष्टीने उपस्थितांना भुरळ पाडली. सुमारे तीन हजारांहून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावताना खेळाडूंचा उत्साह वाढवला. प्रत्येक वजनी गटामध्ये ३०-३५ खेळाडू सहभागी झाल्याने सुरुवातीला १० आणि त्यानंतर अव्वल ५ खेळाडूंची निवड करताना परीक्षकांना चांगलीच कसरत करावी लागली. ५५ किलो आणि ६० किलो वजनी गटाचा अपवाद वगळता प्रत्येक गटाचा विजेता वेगवेगळ्या जिमचा ठरला. ५५ आणि ६० किलो वजनी गटात हेमंत भंडारी व विपुल सावंत या

बॉडी वर्कशॉपच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले

अंतिम फेरीत ७५ किलो वजनी गटाच्या अनिल बिलावापुढे इतर सहा गटविजेते फिके पडले. त्याची लक्षवेधी शरीरयष्टी परीक्षकांनाही मोहित करणारी ठरली. शिवाय प्रेक्षकांनीही अनिलचाच जयघोष केल्याने स्पर्धेचा विजेता कळण्यास फार उशीर झाला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परवानगी व्यतिरिक्त एकही झाड तोडू नका | उच्च न्यायालय

Gauri Tilekar

राणेंना आता काहीच मिळणार नाही | आठवले

News Desk

रविवारी मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक

News Desk