HW News Marathi
मुंबई

पडसलगीकरांना तीन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त तथा विद्यमान पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आज ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार होते. मात्र पडसलगीकरांच्या सेवा ज्येष्ठतेचा उपयोग करुन घेण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

सध्या महाराष्ट्रात तसेच देशात नक्षलवाद्यांविरोधात कारवाई आणि कट्टर हिंदुत्ववाद्यांचे अटकसत्र जोरदार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर तपास सुरु असताना दत्ता पडसलगीकर यांच्यासारख्या अधिकाऱ्याच्या अनुभवाचा फायदा घेण्याची विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारला केली होती. त्यामुळे पडसलगीकर यांना तीन महिने मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती.

तसेच ही विनंती राज्य सरकारने १५ ऑगस्टच्या दरम्यान केंद्रीय गृहविभागाला केली असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्या विनंतीचा सकारात्मक विचार करत केंद्रीय गृहखात्याने पडसलगीकर यांच्या तीन महिन्यांच्या मुदतवाढीला मान्यता दिली आहे. त्यामुळे पडसलगीकरांनंतर कोण? हा प्रश्न निकालात निघाला असून पुढील तीन महिने पडसलगीकरच राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत असतील, सध्या स्पष्ट झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू असणार, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

swarit

महासभेत नगरसेविका गेम खेळण्यात व्यस्त

News Desk

Breaking News| अंधेरीच्या मधु इंडस्ट्रियल इस्टेटच्या एका इमारतीला आग

News Desk