HW News Marathi
मुंबई

प्रभावशाली, प्रगत महाराष्ट्र घडवुया – राज्यपाल सी. विद्यासागर राव

मुंबई : राज्याची सर्वांगीण प्रगती आणि विकास साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. एक प्रभावशाली, प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी शासनाबरोबर सर्वांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्नझाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव डी.के.जैन, माजी मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, अपर मुख्य सचिव शाम लाल गोयल, प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा, आदी मान्यवरउपस्थित होते.

यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्तानेही राज्यपालांनी यावेळी श्रमिक वर्गाला शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. राज्यपाल पुढे म्हणाले, याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, तसेचसमाजसुधारक, महात्मा जोतिबा फुले,सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासारखे इतर थोर नेते यांचे स्मरण करूया, हे आपल्या आधुनिक महाराष्ट्राचे संस्थापक आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिक्षण उपसंचालकाला ११वी च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या मुदतवाढीसाठी घेराव.

News Desk

मुंबईमध्ये गणरायाच्या आगमनाला सुरुवात, कुर्ल्याच्या राजाचे जल्लोषात आगमन 

News Desk

अभिनेता अमेय वाघ ‘होम कोरोंटाईन’मध्ये…मागतोय काही टिप्स…

swarit
राजकारण

भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी खडसेंना दिलासा

News Desk

मुंबई : पुण्याच्या भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना दिलासा मिळाला आहे. खडसेंवरचे आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आला आहे. महसूल मंत्री असताना पदाचा गैरवापर करत त्याचा फायदा नातेवाईकांना करुन दिल्याचा आरोप खडसेंवर होता. एसीबीने या प्रकरणाचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला. आता या पुढील कारवाई कोर्टाच्या आदेशाने होणार आहे.

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पुणे एसीबीने खडसेंना क्लीन चिट दिली आहे. खडसे यांच्याकडून पदाचा गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असे एसीबीने अहवालात म्हटले आहे. खडसेंविरोधातील कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही, असेही या अहवालात एसीबीने नमूद केले आहे.

 

Related posts

कवी छगन भुजबळ,वाचा सविस्तर…

swarit

BMC च्या कामाचे ‘कॅग’कडून ऑडिट; ‘पारदर्शकतेचा आभाव’, फडणवीसांचा आरोप

Aprna

अवनीच्या हत्येची निष्पक्ष चौकशी व्हावी !

News Desk