HW Marathi
मुंबई

आज मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई | मध्य रेल्वे मार्गावर आज (३ मार्च) सकाळी १०.३७ ते दुपारी २.४८ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून या दरम्यान दिवा ते परळ स्थानकांदरम्यान सर्व जलद लोकल गाड्या धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

सीएसएमटीहून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल गाड्या सकाळी १०.०५ ते दुपारी ०२.५४ वाजेपर्यंत ठरलेल्या स्थानकांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा या स्थानकांवर थांबणार आहेत. सकाळी १०.५० नंतर ठाण्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. तर पश्चिम रेल्वेमार्गावर आज सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या कामासाठी आज जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक असणार आहे.सकाळी १०.३५ ते ते दुपारी ३.३५ पर्यंत दोन्ही दिशेच्या धिम्या मार्गावर हा जम्बोब्लॉक असणार आहे.हार्बर मार्गावर देखील आज सकाळी १०.२१ ते दुपारी २.३४ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या लोकल गाड्या बंद राहणार आहेत. तसेच सकाळी १०.२१ पासून दुपारी २.४१ वाजेपर्यंत वाशी, पनवेल, बेलापूरहून सीएसएमटीकडे जाणारी एकही लोकल धावणार नाही.

Related posts

रेल्वेचे ट्रॅकमन करतायत अधिकाऱ्यांची सेवा!

News Desk

उल्हासनगरातील शौचालयचा दुरावस्थेचा ठपका

News Desk

मुंबई महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

News Desk