मुंबई | मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या 24 तासातही मुंबईसह आजबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली सुट्टीची घोषणा
Precautionary holiday declared for schools, colleges in Mumbai Metropolitan Region for the safety of the students due to the heavy rainfall experienced in the city and the suburban areas. Heavy rains forecasted, every one is advised to stay safe.
— Vinod Tawde (@TawdeVinod) July 9, 2018
मुंबईतील पावसाची स्थिती लक्षात घेऊन शाळा महाविद्यालयांना घोषित करण्यात आली आहे. मुंबई तसेच उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या २४ तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या जोरदार पावसामुळे शिक्षणमंत्र्यांनी शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईसह ठाणे, कळवा, मुंब्रा, अंबरनाथ, बदलापूर, वसई, नालासोपारा, पालघरमध्ये जोरदार मुसळधारा सुरू आहेत
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.