HW Marathi
मुंबई

आजपासून दादर, वसई रोड स्थानकातील पादचारी पूल ‘बंद’

मुंबई | पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर आणि वसई रोड रेल्वे स्थानकातील पादचारी पूल दुरुस्ती कारणास्तव आज (१४ मे) बंद करण्यात आला आहे. दादर स्थानकातील चर्चगेट दिशेकडील पादचारी पूल तर वसई रोड स्थानकावरील फलाट क्रमांक ६ आणि ७  मध्यवर्ती पूल सुरक्षेच्या कारणास्तव २९ मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी यादरम्यान पर्यायी पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल दुर्घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुलाची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यास जलद गतीने सुरुवात केली आहे. यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण ४२ नवीन पादचारी पूल, पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी १०० कोटी ८७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Related posts

स्वातंत्र्यदिनी मुंबईत ‘अल्ट्रा रन’

News Desk

आधुनिक यंत्र युगातही वाचन संस्कृती लोप पावणार नाही …

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk