HW News Marathi
मुंबई

व्यापाऱ्यांना फटाका विक्री परवान्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत

अहमदनगर | गणेशोत्सव झाल्यानंतर आता नवरात्रीचे वेध लागलेले आपल्याला दिसत आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर दिवाळीची घाईगडबड आपल्याला पाहायला मिळेल. दिवाळी सणानिमित्त फटाका विक्री परवाने घेण्यासाठी परिपूर्ण अर्जासह २२ ऑक्टोबरपर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा दंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

दिवाळी सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्रीसाठी परवाने दिले जातात. त्यासाठीची आवश्यक अटी व कागदपत्रांची पूर्तता विक्रेत्यांनी करून परवाना प्राप्त करून घ्यावा. परवान्यासाठी आवश्यक असणार्‍या अर्जाचा विहित नमुना (फॉर्म नं. ए.ई.-५) संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात उपलब्ध असेल. अर्जास ५ रुपये कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे. याशिवाय, परवाना शुल्क स्टेट बँकेत चलनाने भरून चलनाची मूळ प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा, भिंत पडल्याने कुर्ल्यात तीन जण जखमी

News Desk

ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केले, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली

News Desk

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे विरोधात गुन्हा दाखल

News Desk