HW News Marathi
मुंबई

जगंली हत्ती गैरव्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कर्नाटकात प्रशिक्षण

मुंबई | कोल्हापूर जिल्ह्यात शेतात धुडगूस घालणाऱ्या जंगली हत्ती तसे गव्याचे हल्ले रोखण्यासाठी कायमस्वरुपी निर्बंध आणण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कर्नाटकमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

जयंत पाटील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनधींनी याप्रश्नी लक्ष्यवेधी उपस्थित केली होती. जयंत पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात शेतात धुडघूस घालणाऱ्या हत्तीला निर्बंध घालण्यासाठी वन विभागातील काही माणसे इथे प्रशिक्षित करण्याची गरज आहे.

कर्नाटक राज्यात प्रशिक्षणासाठी पाठवण्याची गरज आहे. वनखात्याचे अधिकारी मात्र प्रत्यक्षात काही करत नाही. त्यामुळे वनमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करून तेथील लोकप्रतिनीधींना बोलावून अधिकाऱ्यांना काम करण्याचे निर्देश द्यावेत.

हत्ती, गवासाठी संरक्षणात्मक व्यवस्था करणे, कंपाऊंड करून देणे यासाठी बैठक घ्यावी, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान, या प्रकरणी एक समिती स्थापन करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चर्नी रोडचा पादचारी पुल दुरुस्तीसाठी २८ सप्टेंबरपासून बंद

Gauri Tilekar

मालाडमध्ये भीषण आग

News Desk

रेल्वे तिकीट आरक्षणासाठी आधारकार्ड बंधनकारक

News Desk