HW Marathi
मुंबई

मुंबईत नाल्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा १३ तासांपासून शोध सुरु

मुंबई | गोरेगावमध्ये आंबेडकरनगर येथील एक अडीच वर्षांचा चिमुकला रस्त्यावरील उघड्या नाल्यात पडून वाहून गेल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, तब्बल गेल्या १३ तासांपासून अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांकडून या चिमुकल्याचा शोध घेण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु, अद्याप या चिमुकल्याचा शोध लागू शकलेला नाही. दिव्यांश सिंह असे या मुलाचे नाव असून बुधवारी (१० जुलै) रात्री पावणेदहाच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

दिव्यांश हा बुधवारी रात्री पावणेदहाच्या दरम्यान आपल्या घरातून बाहेर चालत असताना रस्त्यावरच्या उघड्या नाल्यात पडला. आधी पडून गेलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याच्या प्रवाहाची गती देखील जास्त होती. त्यातच हा चिमुकला वाहून गेल्याची माहिती मिळते. आपला मुलगा कुठेही दिसत नसल्याचे पाहून या चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा चिमुकला नाल्यात पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Related posts

आज मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक 

News Desk

उल्हासनगरमध्ये वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर धाड, तिघांना अटक

News Desk

डीजेवरील बंदी कायम | उच्च न्यायालय

Gauri Tilekar