HW News Marathi
मुंबई

उद्धव ठाकरेंच्या नावानं मनसैनिकांचा शिमगा 

– कृष्णकुंज बाहेर जोरदार घोषणाबाजी

– बंडखोर नगरसेवक अज्ञात स्थळी

मुंबई मनसेच्या सहा नगरसेवकांना फोडण्याची खदखद मनसैनिकांत आहे. ही खदखद आज बाहेर आली. सकाळपासूनच मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज बाहेर गर्दी केली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे हाय हायच्या घोषणानी शिवाजी पार्क परिसर दणाणून सोडण्यात आला होता. शिवाय जे नगरसेवक मनसे सोडून शिवसेनेत गेलेत त्यांच्यावरही त्यांनी राग व्यक्त केला. दरम्यान शिवसेनेत गेलेल्या ६ ही नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवण्यात आलं आहे. शिवाय त्यांच्या कुटूंबीयांना पोलिस संरक्षणही देण्यात आलं आहे. जो पर्यंत कोकण विभागीय आयुक्तांकडे त्यांच्या स्वतंत्र गटाची स्थापना होत नाही तो पर्यंत हे नगरसेवक अज्ञात स्थळी ठेवण्याची शिवसेनेची रणनिती आहे.

मुंबई महापालिकेतील मनसेचे कार्यालयही जाणार

मनसेचे सहा नगरसेवक फुटल्यानं त्यांच्याकडे आता फक्त १ चं नगरसेवक राहीला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील मनसेला दिलेले पक्ष कार्यालयही काढून घेतले जावू शकते. हे कार्यालय आता समाजवादी पक्षा दिली जाण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे नगरसेवक गेले आणि दुसरीकडे पक्ष कार्यालयही त्यामुळे मनसेच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकार हरमन गोम्स यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

News Desk

अधिकारी ब्रदर्स’चे गौतम अधिकारी यांचे निधन

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Aprna