HW News Marathi
मुंबई

उल्हासनगरमध्ये वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर धाड, तिघांना अटक

प्रफुल्ल चव्हाण

उल्हासनगर – उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एका लॉजमध्ये मोठ्याप्रमाणावर वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या धाडीदरम्यान पोलिसांनी ९ महिलांची सुटका केली असून लॉजमालकासह तिघांना पोलिसांनी अटक केलीय.

उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या धरम पॅलेस लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. यावेळी ९ महिलांची त्या ठिकाणाहून सुटका करण्यात आली. याप्रकरणी लॉजचालक संजय भगत (३२), विनय उर्फ विद्याधर पुजारी (३९), मॅनेजर, भगवान उर्फ राजू नायर, दलाल यांना अटक करण्यात आली आहे.

शहरातील कॅम्प नं. ३ येथील शांतीनगर परिसरात हॉटेल धरम पॅलेस लॉज आहे. हे लॉज एका राजकीय नेत्याचे असून त्या नेत्याच्या छत्र छायेत हा वेश्या व्यवसाय चालत होता. उल्हासनगरमध्ये अनेक लॉजवर खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असून बहुतांश लॉजचे मालक हे राजकीय पक्षांशी संबंधित असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक वारंवार करत असतात. राजकीय नेत्यांशी संबंधित हे लॉज असल्यानं पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

उल्हासनगर शहरात अनेक लॉज मध्ये बांग्लादेशी ,ओरिसा ,आसाम, पश्चिम बंगाल , याठिकाणांहून महिला, अल्पयीन मुलींना मोठ्या पगाराचं आमिष दाखवून त्यांच्याशी खोटे लग्न करून त्यांना इथं आणलं जातं. त्यानंतर या महिला – मुलींना लॉज व हॉटेलमध्ये जबरदस्तीनं डांबून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जातं, अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा ठाण्याच्या पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून पो.उप.नि. कल्याणी पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धरम पॅलेज लॉजवर धाड टाकली. त्यावेळी लॉजमध्ये ९ महिला आढळून आल्या. त्यापैकी २ मुली अल्पवयीन असून त्यांच्याकडूनही वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. ९ महिलांची त्या ठिकाणाहून सुटका करून त्यांची रवानगी उल्हासनगरातील कॅम्प नं. ५ येथील महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. तर आज ३ आरोपींना न्यायालयात हजर केले असता २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संध्याकाळपर्यंत पूल दुर्घटनेचा जबाबदारी कोणाची हे निश्चित करा !

News Desk

काळाचौकीत डिजनीलॅण्ड नंतर यंदा छोटा भीम अवतरणार

swarit

मुंबईवर ‘अस्मानी’ संकट,खासगी आणि सरकारी कार्यालयांना आज सुट्टी जाहीर

News Desk