HW News Marathi
मुंबई

अंडरवर्ल्ड डॉनच्या मुलाचा मृतदेह रेल्वेरुळावर

मुंबई -अंडवर्ल्डमधील बडे प्रस्थ असलेल्या चंद्रकांत खोपडेचा मुलगा गीतेश खोपडे याचा मृतदेह शिवडी रेल्वे रुळावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गीतेश खोपडे ३२ वर्षाचा होता. चंद्रकांत ऊर्फ बाब्या खोपडेच्या गोल्डन गँगने एकेकाळी मुंबई अंडरवर्ल्डमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता. लोअर परेलच्या सन मिल कपांऊडमधून बाब्या खोपडे आपली गोल्डन गँग चालवायचा. हाजी मस्तान, वरदाजन मुदलीयार या अंडरवर्ल्ड डॉनना त्याकाळी गोल्डन गँग संरक्षण द्यायची. गीतेश वडाळयाला राहत होता. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, हा अपघात होता की आत्महत्या ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. रात्री सव्वा बाराच्या सुमारास स्टेशन मॅनेजरला एक व्यक्ती जखमी अवस्थेत लेव्हल क्रॉसिंगवर पडली असल्याची माहिती मिळाली. स्टेशन मॅनेजरने रेल्वे पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीडच्या सुमारास रुग्णालयाने गीतेशला मृत घोषित केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहिल्या पावसात मुंबईकरांची तारांबळ उडाली, मध्य-पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर पूरस्थिती.. मुंबईची झाली तुंबापुरी

News Desk

‘स्वाभिमान’ दुखावताच खोतांनी शेट्टींना दिले पैसे

News Desk