HW News Marathi
मुंबई

तुम्ही संप सुरूच ठेवाल हे आम्हाला अपेक्षित नव्हते !

मुंबई | मुंबई उच्च न्यायालायने बेस्ट संपवरून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. बेस्ट संपावर आमच्या आदेशामुळे तुम्ही संप सुरूच ठेवाल हे आम्हाला अपेक्षित नव्हते, असे म्हणत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांनी संप सुरू ठेऊन चर्चा करणे चुकीचे असून संप आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे देखील उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, यावरची पुढील सुनावणी दुपारी ३ वाजता सुमारास होणार आहे.

मुंबईत गेल्या सात दिवसापासून बेस्ट कर्मचाऱ्याचा संप सुरू आहे. अनेक बैठकांनंतर देखील अद्याप या संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही, अशी बेस्ट कर्मचाऱ्यांची ठाम भूमिका आहे. प्रशासन आणि बेस्ट कर्मचारी त्यांच्या त्यांच्या भूमिकांवर ठाम असल्याने यावर तोडगा निघणे आणखी कठीण झाले आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने या आधीच्या सुनावणीत “आपण यात हस्तक्षेप करणार नाही”, असे म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फोर्टमधील पटेल चेंबर्स इमारतीला भीषण आग

News Desk

भूस्खलन होऊन नागपुरात कुटुंब जमिनीखाली दबले

News Desk

मुंबईसह उपनगरात महिला गोविंदा दहीहंडीसाठी सज्ज

News Desk