मुंबई | पश्चिम रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाल आहे. माहीम रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी (८ मार्च) ७ वाजताच्या सुमारास मालगाडीच्या इंजिन बंद पडले आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे जलद मार्गावरील लोकल गाड्या, स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
Western Railway: Due to technical failure near Mahim railway station, all UP through & DOWN through trains will be running late today by about 15-20 minutes. #Mumbai pic.twitter.com/vlnBIAc2rX
— ANI (@ANI) March 8, 2019
यामुळे अप दिशेकडील धीम्या मार्गावरील वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेने देखील याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्येही इंजिन बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे हार्बर लाईनवरील अंधेरीकडे जाणारी आणि येणारी रेल्वेलाईन बंद होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.