HW News Marathi
मुंबई

मुंबईत कोणत्या सेवा राहणार बंद ?

मुंबई | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आठवडा भरापासून पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. या आंदोलना दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाची शासकीय महापुजा आंदोलकांनी करुन दिली नाही. त्यातच आंदोलना दरम्यान एका आंदोलकाने गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात सुरु असलेल्या या आंदोलनाची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप घेतली नसल्यामुळे आंदोलकांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आषाढी वारीला गेलेल्या वारक-यांची सुरक्षा लक्षात घेता महाराष्ट्रातील काही भागात मंगळवारी तर उर्वरीत भागात बुधवारी बंद पुकारण्यात आला आहे.

कोणत्या सेवा असणार सुरु | शाळा, महाविद्यालये, रक्तपेढ्या, रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, दूध टँकर, स्कूल बस, रेल्वे, मोनो, मेट्रो

कोणत्या सेवा असणार बंद | बेस्ट, एसटी, टॅक्सी, रिक्षा, खासगी वाहने, दुकाने, बाजारपेठा, उद्योग

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकलमध्ये महिलेची प्रसुती

News Desk

जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये डॉ. व्यंकटेश मेतन यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

Gauri Tilekar

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची भारतीय मानक ब्युरोवर सदस्यपदी नियुक्ती

News Desk