HW News Marathi
मुंबई

जागतिक पर्यावरण दिन : वर्सोवामध्ये ‘चला खारफुटी वाचवू या’ मोहीम

मुंबई l जागतिक पर्यावरण दिनानिमिताने भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मोहित भारतीय यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत खारफुटी (मँगरोव्ह) वाचवा हा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ‘चला खारफुटी वाचवू या’ (सेव्ह फॉर मँगरोव्ह) ही मोहीमला आजपासून (५ जून) सुरू करण्यात आली आहे. पर्यावरणाचे जतन करा आणि खारफुटी वाचवा हा संदेश देण्यासाठी काल (४ जून) संध्याकाळी चार वाजता अंधेरी पश्विम वर्सोवामधील जॉगर्स पार्क लोखंडवाला येथे वॉक फॉर मँगरोव्ह या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यावरणाचे रक्षण करणे ही या देशातील सजग नागरिकांची जबाबदारी आहे. मुंबईमध्ये सहा हजार ६०० हेक्टर जमिनीवर मँगरोव्ह आढळून येतो. त्यात उपनगरात ६,४०० हेक्टर तर २०० हेक्टर मुंबई शहरात आहे. त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्व मुंबईकरांची आहे, असे मोहित युवा मोर्चाने म्हटले आहे.

देशाच्या सीमेचे सुरक्षा करणे जितके महत्वाचे आहे तितकीच खारफुटी (मँगरोव्ह) आणि पर्यावरण संरक्षणाची ही आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे खारफुटी वाचविण्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटना कार्यरत आहेत. या मोहिमेत मुंबईतील तरुण वर्ग आणि वर्सोवा येथील जनतेने मोठया संख्येने सहभागी व्हावी, असे आवाहन मोहित युवा मोर्चाने सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री अडचणीत भीडे, एकबोटेंवर कारवाई अशक्य

Adil

मराठा आंदोलकांची उद्या मुंबई बंदची हाक

News Desk

लोया प्रकरणाचे सत्य बाहेर कधी येणार | पृथ्वीराज चव्हाण

News Desk