HW News Marathi
मुंबई

अखेर युती तुटली

मुंबई – मुंबईसह महाराष्ट्रातील भाजपसोबतची युती संपुष्टात आली असल्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगाव येथे विजय संकल्प मेळाव्यात केली.

उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर सडकून टीका केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत युती होणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत उद्धव यांनी युती तुटल्याचे जाहीर केले. यापुढे राज्यात शिवसेना स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत स्वबळावर भगवा फडकवायला शिवसेना समर्थ आहे. शिवसेनेला डिवचणा-यांना शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

युतीसाठी कुणाच्याही दारात कटोरा घेऊन जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

CM Shri Devendra Fadnavis tweets:

*सत्ता हे साध्य नाही साधन आहे विकासाचे. पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र.जे येतील त्यांच्या सोबत जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय.

परिवर्तन तर होणारच !*

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

माझ्या मनात काय आहे ते तुम्ही ओळखलं आहे आणि तुमच्या मनात काय आहे ते मी ओळखलं आहे

मी काय बोलणार याकडे संपूर्ण देश कान टवकारून ऐकतोय

गेल्या ५ वर्षातील दोन्ही महापौरांना (सुनील प्रभू आणि स्नेहल आंबेकर ) यांना मंचावर बोलावले

उद्धव ठाकरे यांनी दोघांच्या कार्याचा गौरव केला

पद्म पुरस्कारांमध्ये एक पुरस्कार गुरूदक्षिणा म्हणून दिल्याचं ऐकलं(हशा)

मला एका गोष्टीचा आनंद वाटत आहे की आप्पासाहेब धर्माधिकारींना हा पुरस्कार मिळाला, मला असं वाटतं की एकाच कुटुंबातील व्यक्तीला पुरस्कार मिळाला आहे.

मी सरकारचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी पुरस्काराला मोठेपणा मिळवून दिला

कोण कोणाच्या बाजूने आहे हेच कळत नाही

देवीदेवतांच्या तस्बीरी सन्मानाने काढा असा फतवा राज्य सरकारने काढलाय

कोणत्याही सरकारी कार्यालयात पूजा-अर्चा चालणार नाही असा आदेश काढला

कसली घाई आहे तुम्हाला, वटहुकून काढायचा असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांना कामस्वरूपी घरं देण्याचा अध्यादेश काढा

सरकारी कामात धर्म येता कामा नये, शिवसेनाप्रमुखही हेच सांगायचे. मात्र तुम्ही ते ही करत नाही

हिम्मत असेल तर समान नागरी कायद्याचा वटहुकून काढा

मागे गांधींच्या जागी नरेंद्र मोदी बसलेत अशा फोटो प्रसिद्ध केला

चरख्यावरून गांधींना हटवलं आता त्यांना उत्तर प्रदेशमध्ये ‘हे राम’ म्हणण्याची वेळ आली आहे

पारदर्शकत म्हणताय मग तस्बीरी हटवण्याचा निर्णय आमच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन घेतला होता

तमिळनाडूमध्ये बैलापेक्षा जास्त पिसाळून जनता रस्त्यावर उतरली आहे

आपल्याला उधळलेल्या बैलाला वेसण घालायची आहे,हे देखील जलिकट्टूच आहे

जर या बैलाला वेसण घालायची हिम्मत मनगटात नसेल तर हातामध्ये भगवा पकडू नका

पहिली पारदर्शकता राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारात आणा

स्थायी समितीमध्ये सर्व पक्षांचे सदस्य असतात, पत्रकार, आयुक्तही असतात

अशीच पद्धत राज्य सरकारमध्ये आणा

तस्बीरी हटवण्याचा विषय कॅबिनेटमध्ये आणला असता, तर आमच्या मंत्र्यांनी त्याला कडाडून विरोध केला असता

हिम्मत असेल तर राज्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांना कॅबिनेटच्या बैठकीत घ्या, पत्रकारांना बोलवा, लोकायुक्तांनाही बोलवा

मग घोटाळ्याचे आरोप होणार नाही

सगळे गुंड पक्षात(भाजपात) येतायत, मला गुंडापुंडाची गरज नाही, कारण माझा सैनिक मर्द आहे

गुंडानी मावळ्याचा वेष घेतला तरी तो मावळा होत नाही

सैनिकांचा मुकाबला करण्याची ताकद नसल्याने गुंड घेतायत

आमच्या अंगावर सोडण्यासाठी गुंड घेत असाल तर माझा सैनिक त्याचा फडशा पाडायला तयार आहे

मग जे काय होईल तर पोलिसांचा वापर करायचा नाही

आमच्या हिंदू पुजाऱ्यांवर आयकर विभाग धाडी टाकतो, मंदिरांवर टाकतो, हिंदू व्यापाऱ्यांवर टाकतायत. एकतरी धाड दुसऱ्या धर्माच्या पुजाऱ्यावर व्यापाऱ्यावर टाकली का ?

आम्ही ठाणे, मुंबई,पुणे सगळं जिंकणार

आम्ही थापा मारून जिंकत नाही, शिवसैनिक जीवाची बाजी लावून मुंबईसाठी धावत असतो

कशासाठी शिवसेनेच्या मुळावर येताय?

आज जी मुंबई तुम्ही गिळायला निघाला आहात ती शिवसेनेशिवाय वाचली असती ?

शिवसेनाप्रमुख जर उभे राहीले नसते ते कचऱ्याच्या डब्यात गेले असते ते सुद्धा अंगावर येतायत, याचं वाईट वाटतंय

भाजपाने ११४ जागा मागितल्या हा शिवसेनेचा अपमान नाही ?

९७ सालापासून आपली युती आहे, कोणाची हवा होती? २०१२ साली आपण आपल्या कामाच्या जोरावर लोकांसमोर गेलो होतो.

त्यावेळेला तुम्ही विवंचनेत होतात, तेव्हा शिवसेनेच्या कामाने तुम्हाला वाचवलंत हे देखील तुम्ही विसरलात ?

शिवसैनिक मरमर राबतो आणि मुंबई जिंकतो, त्यानंतर नगरसेवक वचननामा अंमलात आणतात

मग कशासाठी तुम्हाला जास्त जागा देऊ?

आम्ही कधी उपमुख्यमंत्रीपद, चांगली खाती मिळावी असं मागितलं ?

हे सरकार चालावं म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत

माझ्या घरामध्ये घुसून माझ्यावर येणार असाल तर मी तुमची पंचारती करू ?

मला कोणत्याही भाजपाच्या वरिष्ठाचा फोन आलेला नाही

५० मधील २५ वर्ष आमची युतीमध्ये सडली, देशासाठी ,हिंदुत्वासाठी आम्ही तुमचा उदोउदो करत बसलो

आम्ही सत्तेचे लोभी नाही, शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही

माझ्या शिवसेनेला कमी लेखत असेल तर मी त्याला जागेवर शिल्लक ठेवणार नाही

माझी तयारी निखाऱ्यावर चालण्याची आहे, तुमची आहे, मला अस्तनीतील निखारे नकोत

तुम्ही मला वज्रमूठ द्या दात पाडायचं काम मी करून दाखवतो

तुम्ही वचन देत असाल तर मी आज निर्णय घेतोय की आता याच्यापुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकवेल

याच्यापुढे मी युतीसाठी कोणाच्याही दारात कटोरा घेऊन जाणार नाही

जे काही असेल ते माझ्या शिवसेनेचे, शिवसैनिकांचं असेल

महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये मी कुठेही युती करणार नाही

आता लढाई सुरू झाली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

के.ई.एम. रुग्णालयात हृदयविकार पुनर्जीवन प्रात्‍याक्षिक संपन्‍न

swarit

अंधेरी, प्रिंटींग प्रेसला लागली आग, एकाचा मृत्यू

swarit

मुंबईतही रिपाइंला भाजपकडून सापत्न वागणूक

News Desk