HW News Marathi
मुंबई

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट कामगार संपावर

मुंबई – लोकलनंतर मुंबईची जीवनवाहिनी असलेली बेस्ट बस सेवा यंदा ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ठप्प होण्याची शक्यता आहे. ७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासूनच बेस्ट कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत.

मुंबई महापालिका प्रशासन विविध मागण्यांची कोणतीच दखल घेत नसल्याने अखेर बेस्टच्या कामगार संघटनाने तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले. मात्र आर्थिक मदत मिळवण्यासाठी कामगारांनी आता संपाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे ४४ हजार कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत. बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्धापन दिनी बेस्ट बंद असणार आहे. ७ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने मुंबईकरांची मात्र प्रचंड गैरसोय होणार आहे.

बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने महापालिकेने मदत करून पालकत्वाची भूमिका पार पाडावी, अशी कामगारांची मागणी आहे. मात्र याबाबत पालिका प्रशासनाबरोबरच्या पाच बैठका निष्फळ ठरल्याने अखेर बेस्ट कामगारांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. वडाळा आगारात बेस्ट कामगार संघटनांचे नेते बेमुदत उपोषण तर कामगार साखळी उपोषणाला बसले होते. मात्र गेल्या तीन दिवसात पालिकेचा एकही वरिष्ठ अधिकारी तिथे फिरकला नाही. त्यामुळे कामगार हवालदिल झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोबाइल सावरताना आईने चिमुरडीला दहाव्या मजल्यावरून पाडले

News Desk

मुंबईकरांचा खोळंबा, मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने

News Desk

दूषित पाण्यामुळे नवापुर दांडी खाडीतील अनेक मासे मृत्युमुखी

News Desk