HW News Marathi
मुंबई

ऑगस्टमध्ये सुट्यांचा हंगाम

मुंबईः ऑगस्ट महिन्यात लागोपाठ सुट्ट्यां आल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची तसेच पाच दिवस आठवडा असणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांची चांगलीच चंगळ होणार आहे. कारण या महिन्यात सलग तीन आठवडे वीकेण्डला धरून सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे मधले एक वा दोन दिवस रजा घेऊन सलग ५ ते ६ दिवसांचे सुट्ट्यांचे नियोजन करता येणार आहे. या महिन्यात ४ ऑगस्टला सुट्टी घेतली तर पुढचे ५ ते ७ ऑगस्टपर्यंतचे सलग तीन दिवस सुट्टीचे मिळून ४ दिवसांचा प्लॅन करता येऊ शकतो. त्यापुढील सलग आठवड्यात १२ आणि १३ ऑगस्ट रोजी शनिवार-रविवार, १४ ऑगस्टला जन्माष्टमीला सुटी घेतल्यास १५ ऑगस्टला पुन्हा स्वातंत्र्यदिनाची सुट्टी, त्यानंतर १६ ऑगस्टला सुट्टी घेतल्यास १७ ला पतेतीची सुट्टी अशा सलग ६ दिवसा सुट्ट्या मिळणार आहेत. त्यापुढील आठवड्यात पुन्हा २५ ऑगस्टला शुक्रवारी गणेशोत्सव आणि त्यापुढे शुक्रवार,शनिवार अशी लागून सुट्टी घेता येऊ शकेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आझाद मैदान येथे माथाडी कामगारांचे बेमुदत उपोषण

swarit

भारतीय जनता पक्षाचे घाटकोपरमधील कार्यालय अनधिकृत

News Desk

टोईंग केल्यानंतर ‘ती’ कारमध्ये बसली मग विडीओ शुट करून सोशल मीडियावर टाकले,VIDEO

News Desk