HW News Marathi
मुंबई

कर्जत येथे जमिनीतून धूर आणि गरम वाफ

कर्जत: ऐन पावसाळ्यात कर्जतमध्ये गुरुवारी एका ठिकाणाहून जमिनीतून गरम वाफ बाहेर पडू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा नेमका प्रकार काय आहे, याची माहिती घेण्यासाठी आज ७ जुलै रोजी भूवैज्ञानिकांना या ठिकाणी पाचारण करण्यात येणार आहे.

मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामूळे राज्यभरात अनेक ठिकाणी जमिन खचणे, तडे जाणे असे प्रकार घडले आहेत. मात्र, जमिनीखालून गरम वाफ तसेच धूर येण्याची बाब क्वचित घडत असल्याने कर्जतमध्ये या घटनेने नागरिक भयभित तसेच अचंबित झाले. कर्जत येथील अंबा माता मंदिराच्या समोर जमिनीतून धूर निघत होता. रस्त्यावरून ये-जा करणाºया नागरिकांचे लक्ष याकडे वेधले जात होते. पैकी एका नागरिकाने त्वरीत या घटनेची माहिती कर्जत आपत्ती विभागाच्या अधिकाºयांना दिली. या घटनेची माहिती मिळताच कर्जत नगरपरिषदेचा आपत्तकालीन विभागाचे तसेच तहसिल कार्यालयाच्या आपत्तकालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात आज वरळी बंदची हाक

Aprna

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

News Desk

छगन भुजबळ यांना केईएम हॉस्पिटल मध्ये हलवणार

News Desk