HW News Marathi
मुंबई

गोवंडीत दगडफेक , तीन पोलिस कर्मचारी जखमी

मुंबई गोवंडी येथील एम वार्ड परिसरात राहाणारे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याने या परिसारात शुक्रवारी कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केल्याने 3 पोलिस कर्मचारी जखमी झालेत.याप्रकरणी पोलिसानी 23 जणांवर गुन्हा दाखल केली आहे .

महानगर पालिका निवडणुकीत मतदार याद्यांतून नाव वगळण्यात आल्याने मंगळवारी मुंबईकरांचा पारा चढला होता. मात्र त्याचे पडसाद हे निवडणूकीच्या निकाला दिवशी दिसून आले. एम पूर्व वॉर्ड, गोवंडीतील अनेक नागरिकांची मतदार यादीत नावे नव्हती. त्यामुळे समाजवादी पक्षाचे उमेदवार या प्रभागातून निवडून आले. त्यामुळे पराभव झालेल्या उमेदवारांनी महानगरपालिका कार्यालयात तात्काळ निवडणूक रद्द करून फेरमतदान करावे, असे निवदेन देण्याच्या निमित्ताने गेले होते. त्यावेळी सह आयुक्त व महानगरपालिका उपायुक्त यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मतदारांची नावे यादीत नसल्यामुळे निवडून न आल्याची खंत, यावेळी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. त्यावेळी उमेदवारांच्या जमलेल्या कार्यकर्त्यांना राग अनावर झाल्याने त्यांनी रस्त्यावर गाड्या अडवण्यास सुरूवात केली. तसेच दगडफेक ही केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी जमावाला पांगवण्यास सुरूवात केली. त्यावेळी जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. या मारहाणीत पोलिस उप निरीक्षक मधुकर जाधव, पोलिस शिपाई मंगेश हनुमंत, पोलिस हवालदार राजकुमार हे जखमी झाले. मात्र काही वेळेत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी देवनार पोलिस ठाण्यात निर्मलादेवी वसंत सिंग( कॉंग्रेस आय), कविता त्रिपाठी(अपक्ष), वैशाली पाटील(अपक्ष), श्रीराज (राष्ट्रवादी), मोहम्मद आलम(आप), साजीद खान((राष्ट्रवादी), नसीम बानू(भाजप), रेश्मा देवरेकर(शेकाप), नजीम बानू (अपक्ष), आंबेकर(शिवसेना), मसिन खान(काँग्रेस), कमल गायकवाड (अपक्ष), कमरूनिसा अन्सारी, शेरसीन अन्सारी, शबाना अन्सारी, नवरोज अन्सारी, शरीफ शेख, शेखरूनिसा खान, इरफान शेख, डॉ.नुरी, आजमल शेख, अर्जून शिंदे, तेहरिक अन्सारी आणि हजार जमावावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र पोलिस या आरोपींचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दतात्रय शिंदे यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mumbai Dongri Building Collapsed : मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत !

News Desk

गोरेगावमध्ये इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे

News Desk