HW News Marathi
मुंबई

नव्वद वर्षीय माजी पोस्ट मास्तराचा बालिकेवर बलात्कार

मुंबई: वयातील तब्बल ८० वर्षांच्या अंतरामुळे निर्माण झालेल्या आबोजा – नातीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईत घडली. कुर्ला येथे एका ९० वर्षांच्या निवृत्त पोस्ट मास्तरने शेजारी राहणाऱ्या दहा वर्षीय बालिकेवर सहा महिन्यांपासून बलात्कार

केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सावळा कांबळे असे या नराधम आरोपीचे नाव असून त्याला पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली आहे.

कुर्ला परिसरात १० वर्षांची मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. त्याच परिसरात कांबळे एकमजली घरात राहतो. वरच्या खोलीत मुलगा, सून आणि नातवंडे राहतात. तर खालच्या खोलीत कांबळे एकटाच राहत असे. रंगपंचमीच्या दिवशी कांबळेने पीडित मुलीला घरी बोलावले. तो वृद्ध असल्याने त्याला मदत म्हणून मुलगी घरी गेली. तेव्हा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास बदनामीची धमकी दिली. मुलीच्या शांततेचा फायदा घेत कांबळे तिला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करत होता.

सोमवारी त्याने मुलीला घरी बोलावले. ती घाबरलेल्या अवस्थेत घरी आलेली पाहून आईने तिच्याकडे विचारपूस केली. तेव्हा तिने कांबळेच्या विकृतीला वाचा फोडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देवदत्त धनोकर यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

News Desk

भारताचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

swarit

लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी बायकांची हाणामारी

News Desk
देश / विदेश

अहमदाबादेत मुस्लिमांनी केली मंदिराची स्वच्छता

News Desk

अहमदाबाद गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर तिथे अनोखा बंधुभाव पाहायला मिळत आहे. बनासकांठातील धानेरामध्ये मुस्लिम बांधवांनी येथील मंदिरांमध्ये साचलेला चिखल स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानाचे फोटो वेगाने सोशल मीडियात व्हायरल होतआहेत.

धानेरामध्ये सिद्धिविनायक गणपती आणि सतीमाता मंदिर असून या मंदिरांमध्ये जवळपास ८ ते १० फूट पुराचे पाणी भरले होते. हे पाणी ओसरल्यानंतरमंदिरात चिखलाचा थरच लागला होता. १५ ते २० मुस्लिम बांधवांनी हा सगळा चिखल बाहेर काढून मंदिर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. जमिया उलेमा ए हिंदचे हेकार्यकर्ते पालमपूर येथून आले होते. पुराचा तडाखा बसलेल्या अनेक मंदिरांमध्ये त्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले होते. मी एकटाच सफाई करत असल्याचे पाहून त्यांनीमदतीचा हात पुढे केला. सुमारे दोन तास श्रमदान करून त्यांनी पूर्ण मंदिर स्वच्छ केलं. गणपती मंदिरानंतर त्यांनी जवळच असलेल्या सतीमाता मंदिरातही साफसफाईकेली असे, येथील पुजऱ्याने सांगितले.

Related posts

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात, पत्नीचा झाला मृत्यु

News Desk

बाबा गरीबनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, २५ भाविक जखमी

swarit

पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदीदरम्यान ४ संशयित ताब्यात

News Desk