HW News Marathi
मुंबई

पत्नीला वेश्या व्यवसायास भाग पाडणाऱ्या पतीला अटक

 

अनिरूद्ध गायकवाड

वसई – स्वतःच्या व्यवसायात भांडवलाची रक्कम कमी पडत असल्यानं पतीनं चक्क आपल्या पत्नीलाच वेश्या व्यवसायात लोटल्याची धक्कादायक घटना वसईत समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी पतीला वालीव पोलिसांनी बेड्या ठेकाल्या आहेत.

वसईच्या वालीव पोलीस स्थानकात एका 33 वर्षीय घटस्फोटीत महिलेशी विवाह करून तिला बळजबरीने वेश्या व्यवसायाला प्रवृत्त करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सौरभ कपिल पांडे हा तिला 2012 ते 2013 या काळात राज्यातील विविध ठिकाणी आणि मुंबईतील मालाड मालवणी, मीरारोड आणि इतर शहरात वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवत होता.

वेश्या व्यवसायाला नकार दिल्यानंतर पहिल्या पतीपासून असलेल्या दोन मुलांना ठार मारण्याची धमकीही आरोपी सौरभ पांडे देत असल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला आहे. आरोपीने आधी प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्न केलं.

सौरभ हा फेब्रिकेशनचा व्यवसाय करत होता. त्याला आपला व्यवसाय वाढविण्यासाठी पैशाची गरज होती. म्हणून यासाठी आरोपीनं आपल्या पत्नीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं. सुरुवातीला तिने याला नकार दिल्यानंत आरोपीनं तिला मारहाण करुन सिगरेटचे चटके देणं सुरु केलं आणि बळजबरीनं वेश्या व्यवसायात ढकललं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांचा संताप, मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर फेकला भाजीपाला

News Desk

लता मंगेशकर यांच्या नावाने लाखोंचा गंडा

News Desk

पंतप्रधान मोदींचा आज एकदिवसीय मुंबई दौरा; विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम

Aprna