HW News Marathi
मुंबई

मुंबईतही रिपाइंला भाजपकडून सापत्न वागणूक

पुणे, पिंपरी- चिंचवड आणि सोलापूर मधील आरपीआयच्या उमेदवारांना ‘कमळ’ चिन्हावर लढण्याची सक्ती भाजपने केली. त्यामुळे नाराज झालेल्या आरपीआयने या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई केली. मुंबईतील कुर्ल्याच्या 169 क्रमांकाच्या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आरपीआयचे उमेदवार श्रीकांत भिसे यांनी भाजपचे निवडणूक चिन्ह स्वीकारत पक्षाला वाकुल्या दाखविल्या आहेत. त्यामुळे आरपीआयने भिसे यांना पक्षातून निलंबित केले आहे. आधीच मुंबईत आरपीआयच्या वाट्याला फारच मोजक्‍या जागा आल्या आहेत. त्यातही भाजपच्या या कुरापतींमुळे आरपीआयचे नेते मेटाकुटीला आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मुंबई विभागातून सर्वाधिक म्हणजे 615 मुलांची केली सुटका

Aprna

तरूणावर धारदार शस्त्राने वार करणारा गुन्हेगार अटक

News Desk

गॅस कर्मचार्‍याला महिला कार्यकर्त्यांनी दिला ‘मनसे’ स्टाईलने चोप

News Desk