HW News Marathi
मुंबई

राज्य आणि जिल्हा सहकारी बँकेत नोटबंदी दरम्यान अनियमितता,गोंधळ आणि भ्रष्टाचाराची माहिती नाही- आरबीआय

मुंबई नोटबंदीच्या दरम्यान राज्य आणि जिल्हा सहकारी बैंकेत अनियमितता,गोंधळ आणि भ्रष्टाचाराची कोणतीही माहिती नसल्याचा दावा आरबीआयने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पाठविलेल्या उत्तरात केला आहे. मोदी सरकारने या बँकेतील देवाण घेवाणीत नोट बदलण्याचा आरोप करत आली असून नवीन मूल्यांच्या नोटापासून या बैंकांना दूरच ठेवण्यात आले होते.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरबीआयकडून ही माहिती विचारण्याचा प्रयत्न केला की 8 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2016 या दरम्यान ज्या बैंकांना नवीन नोटांच्या देवाणघेवाणीत अनियमितता, गोंधळ आणि भ्रष्टाचार आढळला आणि ज्या विरोधात कार्यवाही केली अश्या बँकेचे नाव, शाखा, राज्य, आरोप आणि कोणत्या प्रकाराची कार्यवाही केली. अनिल गलगली यांस पाठविलेल्या उत्तरात केंद्रीय जन माहिती अधिकारी ए.जी.रे यांनी स्पष्ट केले आहे की राज्य तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेबाबत मागितलेली माहिती त्यांसकडे उपलब्ध नाही आहे. शहरी सहकारी बैंकेच्या बाबतची माहिती अन्य खात्याकडून दिली जाईल.
14 नोव्हेंबर 2016 रोजी आरबीआयने आदेश जारी करत सर्व जिल्हा सहकारी बैंकेेतील शाखेत एक हजार आणि 500 ची नोट बदलण्यावर बंदी घातली होती. आरबीआयस या बैंकेतून सतत अनियमतिता करत आपल्या ओळखीच्या लोकांकडून नोट बदलण्याच्या तक्रारी मिळत होत्या. अनिल गलगली यांनी सवाल केला आहे की जेव्हा अश्या प्रकारची कोणतीही माहिती आरबीआयकडे नसताना या बैंकेवर प्रतिबंध कश्यासाठी केला गेला? आरबीआयच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि मध्यमवर्गीयांचे खाते या बँकेत होते त्यांस विविध समस्यांना तोंड दयावे लागल्याची खंत अनिल गलगली यांनी व्यक्त केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अधिकारी ब्रदर्स’चे गौतम अधिकारी यांचे निधन

News Desk

जोरदार पावसामुळे मुंबईकरांचे हाल, मध्य रेल्वे ठप्प

News Desk

बाप्पाच्या दर्शनासाठी राणेंच्या घरी फडणवीस

News Desk
महाराष्ट्र

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा मराठी पत्रकार संघाकडून निषेध

News Desk

 

उत्तम बाबळे

नांदेड – राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे जिल्ह्यातील एका संवाद यात्रेच्या कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन करताना पत्रकारावंर घसरले आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. कांबळे यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन पत्रकारांची माफी मागावी अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याकडे नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने देण्यात आले.

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी राबविण्यात येत असलेल्या संवाद यात्रे दरम्यान पत्रकारांविषयी अपशब्दासह अर्वाच्च भाषेचा वापरही केला. मी कोणाला घाबरत नाही, संपादक असो की, पत्रकार असो व पत्रकारांना पाकीटे दिली की, ते कोणाचेही छापतात आज आमचे आहेत उद्या कोणाचेही होतात, असे म्हणून थेट त्यांनी संपादकांवर हल्ला चढवत अर्वाच्च भाषेचाही वापर केला. यामुळे नांदेड मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा निषेध व्यक्त करीत कांबळे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.तसेच यासंबधी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे विभागीय सचिव विजय जोशी, जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे, महानगराध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, महानगर सचिव सुनील पारडे, सहसचिव प्रशांत गवळे, विश्वनाथ देशुमख, गोपाळ देशपांडे, चारूदत्त चौधरी, नागनाथराव देशमुख, बजरंग शुक्ला, प्रकाश नागला, संगमेश्वर बाचे, रविंद्र कुलकर्णी, प्रल्हाद लव्हेकर, महेंद्र देशमुख, अविनाश पाटील, नरेंद्र गडप्पा, माधव अटकोरे, सुभाष लोणे, कमलाकर बिराजदार, हरीहर धुतमल, प्रभाकर लखपत्रेवार, दिपंकर बावस्कर, आझम बेग, कुवरचंद मंडले, संजय सुर्यवंशी, गौतम गळेगावे, सदाशिव गच्चे, राहुल गजेंद्रगडकर, निळकंठ वरळे यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.

Related posts

जयंत पाटील बुद्धिमान माणूस, लाॅकडाऊनबाबत माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सल्ला त्यांना घ्यावा वाटला नसेल !

News Desk

हसन मुश्रीफ सोडणार अहमदनगरचं पालकमंत्री पद?

News Desk

भाजपच्या बंडखोर माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk