HW News Marathi
मुंबई

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे ब्राह्मण समाजात पडसाद

 

  • सोशल मीडियातून ‘त्या’ वक्तव्यावर चर्चा
  • दिलीप कांबळे यांनी मागितली जाहीर माफी
  • शुभम देशमाने

मुंबई – सामाजिक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी लातूरमध्ये नुकतच एक वादग्रस्त वक्तव्य केलं. यामध्ये त्यांनी ‘घाबरायला मी काय ब्राह्मण आहे’ असं म्हटलं होतं. सध्या सोशल मीडियावर या वक्तव्यावरून चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे कांबळे यांनी त्या वक्तव्याबद्दल जाहीर माफीही मागितली आहे.

फेसबुकवर लातूरच्याच अनुप कुलकर्णी यांनी कांबळे यांच्या त्या वक्तव्याचं समर्थन केलंय. अनुप यांची फेसबुक पोस्ट खाली शेअर करत आहोत.

काय चुकीचं बोलले दिलीप कांबळे? उलट अनावधानाने का होइना पण प्रखर वास्तव मांडलं त्यांनी….

“भ्यायला मी काय ब्राह्मण आहे का?” हे त्यांचे उच्चार एक जळजळीत सत्य आहे. कुणीही खेडेकर येतो आणि ब्राह्मण लोकांची आई बहिण काढतो, कुणीही सटरफटर येतो आणि सावरकरांना शिव्या देतो, ज्याचे दहावी पर्यन्त शिक्षण झाले नाही असा वैचारिक उठतो आणि ब्राह्मणांनी इतिहास बदलला अशी बोम्ब मारतो….. आणि ब्राह्मण आपला ऐकून घेत असतो… भीत नसता तर ह्या चुकीच्या गोष्टी सहन केल्या असत्या का?

“आमची शांतता ही आमच्या बुद्धिमत्तेतुन आली आहे” वगैरे डॉयलॉग फ़क्त चित्रपटात शोभतात. प्रत्यक्षात मात्र कुणीही यावे आणि आमची मारून जावे अशी परिस्थिति आहे.

त्यातल्या त्यात आनंदाची बाजु अशी की, जेवढे ब्राह्मण द्वेषी विखारी लोक या समाजात आहेत तेवढेच किंबहुना जास्तच समतोल विचारांचे चांगले लोकही आहेत. त्या मुळेच अजुन पर्यन्त तरी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद एका विशिष्ट मर्यादेपर्यंत रोखला गेला आहे.

अल्पसंख्यांक असणे हा ब्राह्मण समाजाचा गुन्हा असेल तर होय मी मान्य करतो की, “मी भीतो कारण मी अल्पसंख्य आहे, मी ब्राह्मण आहे….”

पुण्याचे पत्रकार आशिष चांदोरकर यांनीही फेसबुकवर याप्रकरणी प्रतिक्रिया नोंदविली आहे. ती खाली देत आहोत…

इतिहास माहिती नसेल तर करून घ्या…

दिलीपभाऊ, तुमच्याकडून अपेक्षा नव्हती… दोनवेळा मंत्रीपद देऊनही कोणतेही रचनात्मक आणि ठोस काम न करणारी व्यक्ती म्हणूनच तुमची ओळख आहे. कधीकाळी गजरे विकणारा माणूस राज्यमंत्री झाला, म्हणून आम्हालाही आनंद झाला होता. पण आपण आपल्या कर्माने ही पुण्याई पायदळी तुडविली. आणि आता आणखी गुण उधळून उरलीसुरली पुण्याई धुळीस मिळवून टाकत आहात… तसंही तुमची पुण्याई ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे आणि तुमच्या जातीची आहे. तुमचे वैयक्तिक काही आहे, असे वाटत नाही.

वेळीच सावध व्हा इतकेच सांगणे आहे. तुम्ही ज्या संघटनेतून आलात, ती संघटना जातीपातीच्या पलिकडील म्हणून प्रसिद्ध आहे. ही असली दळभद्री वक्तव्ये म्हणजे तुम्ही त्या संघटनेच्या विचारांना हरताळ फासत आहात, एवढेच म्हणता येईल. तुम्ही ज्या ब्राह्मणांना भिणारे म्हणत आहात, तेच ब्राह्मण अटकेपार झेंडे लावून आले होते दिलीपभाऊ… इतिहास माहिती नसेल तर करून घ्या… तेवढं तरी जमू शकेल तुम्हाला. बाकी काही जमो न जमो…

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिक्षक परिषद भाजपाकडून हायजॅक !

News Desk

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

बातमीचा इम्पॅक्ट | धारावीचा शेटवाडी नाला झाला साफ

swarit