HW News Marathi
देश / विदेश

अडीचशे वर्ष जगलेल्या माणसाची कथा

बिजिंग(वृत्तसंस्था): चीनच्या ली-चिंग यूएन ही व्यक्ती शंभर, दीडशे नव्हे तर तब्बल अडीचशे वर्षे जगली. हे वास्तव आहे. न्यूयॉर्क टाइम्सने ली चिंग यूएन यांच्या १५० व्या वाढदिवसासंबंधी १९३० मध्ये एक लेख प्रकाशित केला होता. वयाच्या दहाव्या वर्षी ली चिंग यूएन यांनी वनऔषधींचा विक्रेता म्हणून काम करायला सुरूवात केली. ली चिंग यूएन हे डोंगर रांगांमध्ये जाऊन वनऔषधी गोळा करत असत. वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत त्यांनी हा व्यवसाय केला आणि ते डोंगरांमध्ये जाऊन त्यांना वनऔषधींची चांगली माहिती झाली. आहार काय घ्यावा आणि तंदुरूस्त कसं राहावं यासंबंधी त्यांनी काटेकोर पथ्य पाळायला सुरूवात केली. लिंग ची यूएन यांचा जन्म १६७७ साली चीनच्या शेजिया शहरात झाला होता. आपल्या संपूर्ण आयुष्यात ली चिंग यूएन यांनी २३ वेळा विवाह केला आणि त्यांना २०० मुले झाली. ली चिंग यांनी वनऔषधी देणारा डॉक्टर म्हणूनही ख्याती मिळवली. ६ मे १९३३ रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचं वय २५६ वर्षे होते.

मन शांत ठेवा, कबुतराप्रमाणे चाला, कासवासारखे बसा आणि कुत्र्यासारखे झोपा तुमचे आयुष्य वाढेल असे ली चिंग मृत्यू शय्येवर असताना म्हटले होते. आहाराची काटेकोर पथ्य पाळणे हेदेखील माज्या दीर्घ आयुष्याचे रहस्य आहे असंही ली यांनी म्हटले आहे. मी या जगात जन्माला आलो आणि मला हवे ते सगळं केले असेही ली यांनी आपल्या शेवटच्या क्षणी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर मराठा आरक्षणाची सुनावणी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय

News Desk

नवीन संसद भवनाच्या बांधकामाला सुप्रीम कोर्टाने दिली स्थगिती   

News Desk

टायगर अभी जिंदा है’, वर ज्योतिरादित्य यांना दिग्विजय सिंह यांचे प्रत्युत्तर

News Desk