HW News Marathi
देश / विदेश

अनु चाचणी करण्यासाठी अमेरिककेडून पाच अब्ज डॉलर्सची ऑफर- शरीफ

लाहोर- पाकिस्तानने 1998 साली केलेल्या अणूचाचणीबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तानने अणूचाचणी करू नये, यासाठी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला पाच अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती, असा दावा शरीफ यांनी केला आहे. मी देशाप्रती प्रामणिक नसतो तर मी ही ऑफर स्वीकारुन अणू चाचणी केली नसती, असेही नवाझ शरीफ म्हणाले.

भारतानेतत्कालिन पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली पोखरणमध्ये 1998 साली यशस्वी अणूचाचणी केल्यानंतर पाकिस्तानात मोठया प्रमाणावर अस्वस्थतता निर्माण झाली होती. त्यानंतर पाकिस्ताननेही लगेच काही दिवसांनी अणूचाचणी केली होती.

पंजाबच्यासियालकोटमध्ये बुधवारी एका सभेला संबोधित करताना शरीफ यांनी हा दावा केला. सध्या नवाझ शरीफ भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये फसले आहेत. दरम्यान, पनामा पेपर लीक प्रकरणात नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांची परदेशात अनेक कंपन्या बेनामी मालमत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे. त्यामुळे शरीफ यांनी हा खुलासा करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा तसेच देशप्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील ४० व्या संचार उपग्रहाचे प्रक्षेपण

News Desk

हवामान बदलामुळे पहिल्याच दिवशी अमरनाथ यात्रेला ब्रेक

News Desk

पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची गरज | लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत

Gauri Tilekar