HW News Marathi
देश / विदेश

अभिनेते, खासदार विनोद खन्ना यांचं निधन

मुंबई – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते तथा खासदार विनोद खन्ना यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपूर्वी शरीरातील पाणी कमी झाल्याच्या कारणामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी गिरगावातील एचएन रिलायन्स फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

विनोद खन्ना यांचा हॉस्पिटलमधील फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये विनोद खन्ना त्यांना ओळखणंही कठीण झाले होते. आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना मूत्रपिंडाचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले होते.

विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ यांसारखे अनेक शानदार सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या मात्र यानंतर त्यांना मुख्य नायकाचे सिनेमे मिळत गेले. विनोद खन्ना यांनी 1968मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तर शाहरुख खान आणि वरुण धवन यांच्यासोबत ‘दिलवाले’ या सिनेमात ते शेवटचे दिसले होते. विनोद खन्ना यांच्यावर वरळीतल्या फोर सिजन हॉटेल जवळील वैकुंठ धाम इथं आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्याला मसूद अझहर ‘जी’ म्हणाले

News Desk

दिल्ली व काश्मीर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, राज्यात हाय अ‍ॅलर्ट

News Desk

“….त्यामुळे तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागणार आहे”, भाजपने ममतांना सुनावले

News Desk