बीजिंग उत्तर कोरियानं केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत चीनवर नाराजी व्यक्त केली होती. ट्रम्प म्हणाले होते, मी चीनमुळे खूप निराश आहे. आमच्या मागच्या नेत्यांनी त्यांना व्यापारात करोडो डॉलर कमावण्याची मोकळीक दिली होती. चीन उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर अमेरिकेसाठी काहीच करू शकत नाही. चीननं वार्तालापाशिवाय उत्तर कोरियाशी अमेरिकेचे संबंध सुधारण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नाही. चीन ही समस्या चुटकीसरशी सोडवू शकत होता. मात्र हे जास्त दिवस चालणार नाही, ही समस्या तात्काळ निकालात काढणार आहोत. अमेरिका सहयोगी देशांच्या संरक्षणाखातर शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post