HW News Marathi
देश / विदेश

आईचे दूध मिळत नसल्याने दरवर्षी अडीच लाख बालकांचा मृत्यू

नूयॉर्क (वृत्तसंस्था)- नवजात बालकांसाठी आईचे दूध सर्वकाही असते. मुलांची वाढ होण्यासाठी किमान सहा महिने आईचे दूध मुलांना मिळणे गरजेचे आहे. परंतु अनेक माता स्तनपान न करता बाहेरील दूध पाजतात. परंतु हे दूध बालकांसाठी घातक असते. याच कारणास्तव जगभरात दरवर्षी २ लाख ३६ हजार बालकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहीत समोर आली आहे.

युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर स्तनपान वाढविण्यासाठी जगातील कोणताही देश शिफारस केलेली मानके पूर्णत: पूर्ण करत नाही. त्यामुळे बालकांच्या मृत्यूंमध्ये वाढ होते आहे. चीन, भारत,इंडोनेशिया, मेक्सिको आणि नायजेरिया या जगातील प्रमुख पाच उदयोन्मुख अर्थव्यवस्था स्तनपानाबाबतचे प्रबोधन करण्यासाठी अतिशय कमी गुंतवणूक करतात.

प्रत्येक वर्षी निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेले देश स्तनपानाला चालना देण्यासाठी जवळपास २५० दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च करतात. देणगीदार यासाठी फक्त ८५ दशलक्ष अमेरिकन डॉलर प्रदान करतात, असे अहवालामध्ये म्हटले आहे. जागतिक स्तनपान स्कोअरकार्डनुसार १९४ देशांचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये सहा महिन्यापर्यंत फक्त ४० टक्के मुले स्तनपान करतात. आणि फक्त २३ देशांमध्ये स्तनपान करण्याचा दर ६० टक्केपेक्षा अधिक आहे. जन्मापासून पुढील दोन वर्षांपर्यंत स्तनपान करणे आवश्यक आहे. यासाठी देशांनी आवश्यक ते प्रबोधन करावे, अशी मागणी अहवालात करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निर्भया प्रकरणात सोनिया गांधींच अनुकरण करा…

swarit

उर्जित पटेल यांच्याबाबत तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का ?

News Desk

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच ‘हे’ सगळं सुरु, नवनीत राणांचा गंभीर आरोप 

News Desk