HW News Marathi
देश / विदेश

आयएएस अधिकारी एका बिछान्यात दोन तरुणींसोबत

श्रीनगर – जम्मू – काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात उपआयुक्त पदावर कार्यरत असलेले आएएस अधिकारी नीरज कुमार यांचे दोन मुलींसोबतचे बिछान्यातील आक्षेपार्ह फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर राज्य सरकारने त्यांना पदावरून तत्काळ दूर केले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

एका बिछान्यात दोन तरुणींसोबत

फोटोमध्ये आयएएस नीरज कुमार निळ्या रंगाचे टी-शर्ट परिधान करून उताणी झोपले आहेत. तसेच एक तरुणी त्यांच्या अंगावर, तर एक त्यांच्याशेजारी झोपलेली दिसते. याबाबत राज्य सरकरकडे आलेल्या तक्रारीनंतर तत्काळ त्यांना पदावरून दूर करण्यात आले.

दरम्यान, व्हायरल होत असलेले फोटो ओरिजनल आहेत की, टेंपरिंग केलेले हे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्याच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.नीरज कुमार कोण?

नीरज कुमार २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग उधमपूर जिल्ह्यातउपआयुक्तपदी होती. ते मूळचे बिहारमधील कटिहारी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत नीरज कुमार यांना विभागीय आयुक्त कार्यालयात काम करण्यास सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे शेतकरी नव्हते, तर ते सत्ताधाऱ्यांपैकीच होते”, शरद पवारांचे मोठे वक्तव्य  

News Desk

बंगळूरू मध्ये सोशल मिडीयावरील पोस्टमुळे हिंसाचार, ३ जणांचा मृत्यु तर ६० पोलीस जखमी

News Desk

‘सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारलं’, कारण…..

News Desk