HW News Marathi
देश / विदेश

आरएसएस आणणार कामसूत्र

वृत्तसंस्थाः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मनुस्मृतीप्रमाणे कामसूत्र पुस्तकाची नवी आवृत्ती घेऊन येणार आहे. या पुस्तकाचं नाव काऊमसूत्रअसेल. माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी याबाबत माहिती दिली आहे. कामसूत्र हे प्राचीन भारताची परंपरा सांगणारं, स्त्री आणि पुरूष यांच्यातल्या शरीर संबंधांचं वर्णन करणारं पुस्तक आहे. वात्सायन या ऋषींनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे, हे पुस्तक एखाद्या सेक्स गाईडप्रमाणे वापरलं जात आहे.

मात्र संजीव भट्ट यांनी याच पुस्तकाचा आधार घेत मनुस्मृतीप्रमाणे आता संघी लोक कामसुत्राचीही पवित्र आवृत्ती घेऊन येणार आहेत आणि लोक त्यालाकाऊमसूत्रअसं म्हणतील असं ट्विट केलं आहे. देशभरात सध्या गोरक्षेचा मुद्दा गाजतो आहे अशात आता माजी आयपीएस अधिकारी यांनी हाच मुद्दा थेट कामसुत्रासोबत जोडला आहे, त्यांचा हा ट्विट वाद निर्माण करणार यात शंकाच नाहीये. हा ट्विट केल्यानंतर संजीव भट्ट यांच्यावर नेटिझन्सनी टीका करायला सुरूवात केली आहे. सॉरी डिअर तुला कामसुत्रापेक्षा घाणेरडा शब्द सापडला नाही का? असा प्रश्न गोपाळ नावाच्या युझरनं विचारला आहे. तुमच्यासारखे सणकी लोक आपल्या महान देशासोबत काय खेळ करू इच्छितात हे माहिती नाही अशीही प्रतिक्रिया एका युझरनं दिली आहे. तुम्ही कोणत्या जगात वावरत आहात मिस्टर भट्ट या सत्ताधाऱ्यांनी तर आधीच काऊमसूत्रची निर्मिती केली आहे अशीही खोचक टीका आणखी एका युझरनं केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आमदारांची दुसरी बैठकही वगळली

News Desk

कलम ३७० रद्द करण्याविरोधी याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Gauri Tilekar

“कोरोना वायरस म्हणून अपमान केलेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा!”

News Desk