HW News Marathi
देश / विदेश

छोटा राजनसह चौघांना सात वर्षांचा कारावास

 

हाच तो बनावट पासपोर्ट

  • बनावट पासपोर्ट प्रकरणी झाली शिक्षा

नवी दिल्ली – कुख्यात गुंड छोटा राजनसह चौघांना बनावट पासपोर्ट प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बनावट पासपोर्ट प्रकरणी छोटा राजन याच्यासह पासपोर्ट अधिकारी जयश्री दत्तात्रय रहाटे, दीपक नटवरलाल आणि ललिता लक्ष्मणन यांना काल (दि.24) विशेष न्यायालयाने दोषी ठरविले होते.

सीबीआयने त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे, फसवणूक, खोटी कागदपत्रे बनविणे असे आरोपपत्र दाखल केले होते. तसेच, बंगळुरुमध्ये 1998-99 साली पोस्टपोर्ट अधिकारी रहाटे, शहा आणि लक्ष्मणनच्या मदतीने छोटा राजनने मोहन कुमार अशा नावाने बनावट पासपोर्ट मिळवला होता असा आरोप सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला होता. दरम्यान, याप्रकरणी या चौघांना विशेष न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर आज झालेल्या सुनावणीत सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी 15, 000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

छोटा राजन याच्यावर भारतात दहशतवादी कृत्य, खून, अपहरण, तस्करी अशाप्रकारचे 85 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 2015 मध्ये इंडोनेशियाच्या पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याचे इंडोनेशियातून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. सध्या तो सीबीआयच्या ताब्यात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्लात दोन पोलीस शहीद

News Desk

विना अनुदानित सिलिंडर ५९ रुपयांनी महागले

swarit

कोरोनाकाळात या देशामध्ये होतेय निवडणुक,मतदानही सुरू

News Desk