HW News Marathi
देश / विदेश

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात 25 जवान शहीद

सुकमा – छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातील काला पठारजवळ चिंतागुफा इथे ही चकमक उडाली. नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

सुकमा जिल्ह्यात काला पठारजवळ चिंतागुफा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 74 बटालियनचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले तर काही जण जखमी असल्याची माहिती मिळाली होती .जखमी झालेल्या जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आता एकून २५ जवान शहीद झाल्याचे समोर आले आहे.

सीआरपीएफच्या कॅम्पजवळ जादा जवानांचा फौजफाटा वाढविण्यात आला आहे. तसेच, जवानांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. गेल्यावर्षी याच सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे १२ जवान शहीद झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : आयकर, जीएसटी परतावा भरण्याची मुदत ३० जून, अर्थमंत्र्यांची घोषणा

swarit

सुनेने दुधात विष मिसळलं. सासरकडील १३ जणांचा मृत्यू

News Desk

आर्थिक संकटातून जाणारा देश न बघवल्याने जर्मनीच्या अर्थमंत्र्यांनी केली आत्महत्या

swarit