HW News Marathi
देश / विदेश

ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येप्रकरणी वाहन चालकाला जन्मठेप

नवी दिल्ली – आपल्या पूर्वीच्या मालकाच्या वडिलांची हत्या केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने एका सिद्धदोष आरोपीला बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा गुन्हा रागाच्या भरात घडलेला नव्हे, तर नियोजित कट आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

मुकेश कुमार (३४) असे शिक्षा झालेल्याचे नाव असून तो पेशाने वाहन चालक आहे. त्याने ६८ वर्षिय देवेंद्र मारवाह यांची हत्या करून त्यांच्या अंगावरील दागिने चोरून नेले होते. हे दागिने त्याला अटक केल्यानंतर त्याच्या खोलीत पोलीसांना सापडले.

मुकेशने मारवाह यांच्याकडून कर्ज घेतले होते, त्याची परतफेड करण्यासाठी त्यांनी मुकेशच्या मागे भूणभूण लावली होती. तसेच कर्ज फेडता येत नसेल, तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे घेऊन ये, अशी मागणी मारवाह यांनी केली होती, असे बचाव पक्षाचे म्हणणे होते, मात्र न्यायालयाने ते फेटाळून लावले आणि हा गंभीर गुन्हा असल्याचे निरीक्षण नोंदवित आरोपीला कठोर शिक्षा सुनावली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंदे भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aprna

#CoronaVirus | पंतप्रधानांनी घोषित केलेला ‘जनता कर्फ्यू’ म्हणजे नक्की काय ?

News Desk

‘शरद पवारांकडून अमित शहांना खास आमंत्रण’, पुण्यात होणार दुसरी भेट

News Desk