पटना( वृत्तसंस्था) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन देशभर खळबळ उडवून देणारे संयुक्त जनता जलाचे नेते नितीशकुमार यांची राजकीय खेळी फार पूर्वी ठरलेली होती, हे आज भाजपसोबत झालेल्या य़ुतीनंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले. या सर्व नाट्यांची संहिता बिहार निवडणूक प्रचारादरम्यान संघानेच तयार केल्याचेही या निमित्ताने उघडकीस आले आहे.
लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेतल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी आज राजभवनात पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीशकुमार हे सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. नितीश कुमार यांनी बुधवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला होता. आज सकाळी राजभवनात मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. त्याआधी सकाळी नितीशकुमार, सुशीलकुमार मोदी यांच्यासह जे. पी. नड्डा हे राजभवनात पोहोचले. सकाळी १० च्या सुमारास राजभवनात शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. राज्यपाल त्रिपाठी यांनी सुरुवातीला नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली
तत्पूर्वी, राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी नितीशकुमार यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले. महात्मा गांधी सेतूजवळ त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली होती. दरम्यान, राजदच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली. या सर्व घडामोडी आधीच ठरलेल्या होत्या हे आता देशाला कळले आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.