HW News Marathi
देश / विदेश

डीन निलंबित, ऑक्सिजनमुळे मृत्यू झालाच नाही, सरकारचा दावा

लखनौ (वृत्तसंस्था) गोरखपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजमधील 63 बालकांच्या मृत्यूप्रकरणी महाविदयालयाच्या डीनला निलंबित करण्यात आले. तथापि ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प झाल्याने बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सरकारने फेटाळून लावले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

शासकीय रुग्णालयासाठी ऑक्सिजन पुरवठादाराची काही लाखांची रक्कम थकली होती. त्याने पुरवठा ठप्प केल्याने बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पुरवठा सुरळीत करण्यासाठी थकीत रकमेचा भरणा करा, असे पत्र पुरवठादाराने महाविद्यालयास पाठवले होते. परंतु त्याकडे महाविद्यालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा ठपका ठेवत महाविद्यालयाच्या डीनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या घटनेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जबाबदार असून त्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विरोधककांनी या मुद्याचे भांडवल करत मोदींवर निशाणा साधला आहे. एरवी उठसूठ ट्विट करणारे मोदी या घटनेबाबत गप्प का, असा सवाल नेटीझन्स विचारत आहेत. योगी-योगी म्हणून तळी उचलणारी माध्यमे देखील वेगळीच बाजू दाखवून दिशाभूल करत असल्याचा आरोप होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CBSE बोर्डाची १०वीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार  

News Desk

हैदराबादमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, ११ मंजुरांचा मृत्यू

Aprna

ठरलं! यूएईत होणार IPL २०२१चे उर्वरित सामने

News Desk