HW News Marathi
देश / विदेश

त्रिशतकवीर मोहितला आयपीएलकडून ऑफऱ

 

  • आयपीएल स्पर्धेत खेळण्याची दाट शक्यता
  • अवघ्या 72 चेंडूत तडकावले त्रिशतक

अक्षय कदम

नवी दिल्ली – ट्वेंटी-20 सामन्यात चक्क त्रिशतक झळकाविण्याची कामगिरी करून काही तास उलटत नाहीत तोच मोहित अहलावत या क्रिकेटपटूला आता थेट आयपीएलमध्ये खेळण्याची संधी चालून आली आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून मोहितला चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे.

दिल्लीतील लक्ष्मीनगर भागातील ललिता पार्कमध्ये मंगळवारी मावी इलेव्हन आणि फ्रेंड्स इलेव्हन यांच्यात झालेल्या सामन्यात मोहितने नाबाद 300 धावा करण्याचा पराक्रम केला. मोहितने सलामीला खेळताना फक्त 72 चेंडूत 14 चौकार आणि 39 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 300 धावा केल्या. त्याच्याबरोबर गौरवनेही 86 धावा केल्याने संघाने तब्बल 416 धावांचा डोंगर रचला.

मोहितचे प्रशिक्षक संजय भारद्वाज हे भारतीय संघातील माजी खेळाडू गौतम गंभीर आणि 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद यांचेही प्रशिक्षक होते. मोहितला दिल्ली डेअरडेव्हिल्सने संधी दिल्याने मी खूप आनंद असल्याचे, भारद्वाज यांनी म्हटले आहे. त्याला आयुष्यात काहीही सहजरित्या मिळालेले नाही. तो शेतकऱ्याचा मुलगा असून, क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण केले. मोहितला देशासाठी खेळायचे आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रशिक्षक सुनील विल्सन यांनी मोहितला चाचणीसाठी बोलविले आहे. मला आशा आहे, की तो त्यांना नक्कीच प्रभावित करेल. तो यष्टीरक्षकही असून, त्याची फलंदाजीची शैली उत्तम आहे, असे कौतुक भारद्वाज यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात १४७ कोरोना बाधित, राज्यात एकूण रुग्ण संख्या ४२ वर

swarit

शबरीमाला निर्णयाच्या निषेधार्थ केरळ बंद

swarit

महंत भास्करदास यांचे निधन

News Desk