HW News Marathi
देश / विदेश

नक्षलवाद्यांना विकास नकोय – गृहमंत्री राजनाथ सिंह

रायपूर – नक्षलवाद्यांचा हल्ला म्हणजे थंड डोक्याने केलेली हत्याच आहे. त्यांना विकास नको आहे. त्यांचे कोणतेच इरादे पूर्ण होऊ दिले जाणार नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नक्षलवाद्यांना इशारा दिला आहे.

सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह उपस्थित होते. राजनाथसिंहांनी रायपूर येथेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक केली.

छत्तीसगडच्या सुकमामध्ये सीआरपीएफ जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. चकमकीत २५ जवान शहीद झाले. कंपनी कमांडरसह ७ ते ८ जवान बेपत्ता आहेत. छत्तीसगडमध्ये सात वर्षांतील सीआरपीएफवरील हा सर्वात मोठा हल्ला आहे. यापूर्वी २०१० मध्ये ७६ जवान शहीद झाले होते. सोमवारच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना एअरलिफ्ट करून रायपूरला आणण्यात आले. नक्षलवादी गावकऱ्यांची ढाल बनवून हल्ला करत होते.

९९ जवान दोरनापालजवळ बांधकाम सुरू असलेल्या रस्त्याच्या सुरक्षेत तैनात होते. दुपारी १२.३० वाजता नक्षल्यांनी बारुदी सुरूंगाचा स्फोट केला. त्यानंतर बेछूट गोळीबार सुरू केला. जवानांनीही प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. ३०० हून जास्त हल्लेखोर होते. चकमकीत २० पेक्षा जास्त नक्षली मारले गेले, असा पोलिसांचा दावा आहे. छत्तीसगडला तेलंगणशी जोडणाऱ्या रस्त्याच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांवर ११ मार्च रोजी झालेल्या हल्ल्यात १२ जवान शहीद झाले होते. गावकरी समोर होते, त्यामुळे आम्हाला नक्षल्यांवर नेम धरून गोळीबार करावा लागल्याचे या हल्ल्यातील जखमी शेर मोहंमद यांनी सांगितले. नक्षलवादी व गावकरी मिळून चार-पाचशे लोक असावेत. त्यात महिलाही होत्या. त्यांनी पहिल्यांदा हल्ला केला. नक्षली गावकऱ्यांच्या आड होते. गावकरी मधोमध होते त्यामुळे आम्ही गोळ्या चालवू शकत नव्हतो. नक्षलवाद्यांवर नेम धरून गोळ्या चालवल्या. आम्ही रस्ता सुरक्षेत तैनात होतो. हेलिकॉप्टरमधून रायपूरला येत होतो तेव्हा काेब्रा कमांडोची तुकडी घटनास्थळी येत होती. नक्षलवाद्यांकडे स्वयंचलित शस्त्र होते, असे शेर महमद यांनी सांगतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जुलैपासून मोबाईल नंबर होणार 13 अंकी

Adil

अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल

News Desk

नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर अजित पवारांची प्रतिक्रिया..

News Desk