HW News Marathi
देश / विदेश

नासाचेही गुरूला अभिवादन

वृत्तसंस्थाः आपल्या आयुष्यात एकतरी व्यक्ती आदर्श किंवा गुरूतूल्य असते. त्या शिवाय आपली जडणघडण अशक्यप्राय आहे. प्रत्येकजण एकाला तरी गुरू मानतोच. त्याचमुळे देशात सर्वक्ष गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा आहे. परंतु यंदाच गुरुपोर्णिमा जगव्यापी झाल्याचे दिसते. त्याचे कारण म्हणजे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासानेही गुरूपोर्णिमेचे याचे स्मरण केले आहे. शनिवारी नासाने गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या टि्वटर हँडलवर चंद्राचे छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच्या चंद्राला जगभरात आणखी कोणकोणत्या नावाने ओळखले जाते याचीही माहिती दिली. यामध्ये गुरुपौर्णिमा सर्वांत वरती आहे. या दिवशीच्या चंद्राची अन्य नावे मून, मीड मून, राइप कॉर्न मून, बक मून व थंडर मून आहेत.

नासाचे हे टि्वट भारतासह जगभरातील नागरिकांना आवडत आहे. नासाने सांगितलेल्या वेगवेगळ्या नावांशिवाय त्यांच्याकडून गुरुपौर्णिमेची अन्य नावे सांगितली जात आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार, नासाने अखेर आपल्या गुरुपौर्णिमेला गुरू मानले ही देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. नासाचे टि्वट लोकांनी मोठ्या प्रमाणात रिटि्वट केल्यानंतर ते लाइकही झाले. आषाढ महिन्यातील पौर्णिमेस गुरुपौर्णिमा म्हटले जाते. याच दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला होता. त्यांनीच चार वेद लिहिले असे मानले जाते. त्यामुळे त्यांना वेद व्यासही संबोधले जाते. त्यांच्या नावावर गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. याशिवाय नासाने सांगितली पाच नावे जुलै महिन्यात ईशान्य अमेरिका आणि इंग्लंडमधील शेतकऱ्यांमध्ये तोंडी असतात. या दिवशी ते शेतात येणाऱ्या पिकांच्या स्वागताचा उत्सव साजरा करतात.रात्रभर नाचगाणे केले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सौदीमध्ये आजपासून महिला चालविणार गाड्या

News Desk

३७० कलम रद्द केल्यास जम्मू-काश्मीरचे भारतासोबतचे संबंध संपतील !

News Desk

दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची निवडणूक आयोगासंदर्भातील ‘ही’ याचिका फेटाळली

Aprna