HW News Marathi
देश / विदेश

पाक सरकारच्या संकेतस्थळावर चक्क भारताचे राष्ट्रगीत

इस्लामाबाद- भारताचा सख्खा शेजारी आणि पक्का वैरी असलेल्या पाकिस्तान सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर चक्क भारताचे राष्टगीत आणि भारतीय स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा झळकल्याने काही काळ खळबळ उडाली होती. अखेर त्यांचे संकेतस्थळ अज्ञात हॅकररने हॅक करण्यात आल्याचे पाकच्या लक्षात आले. चार महिन्यांपूर्वीच एका पाकप्रेमी हॅकर ग्रुपने भारतातील नामवंत शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइट हॅक केल्या होत्या. आयआयटी दिल्ली, आयआयटी वाराणसी, अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाच्या वेबसाइटना हॅकर्सनी लक्ष्य केले होते. या वेबसाइट्सवर भारतविरोधी मजकूर पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर आता हॅकर्सनी थेट पाकिस्तान सरकारच्या अधिकृत वेबसाइटलाच लक्ष्य करून झटका दिला आहे. www.pakistan.gov.pk हे पाकिस्तान सरकारचे अधिकृत संकेतस्थळ असून काही वेळाने ही चूक सुधारण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा म्हणतात, मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन ? 

News Desk

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण सोहळा

News Desk

भय्यू महाराजांसह पाच गुरूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

News Desk