HW News Marathi
देश / विदेश

भारताच्या पोरी लय भारी, हरमनप्रीत खेळली सेहवाग सारखी

वृत्तसंस्थाः अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरच्या शानदार दीडशतकी खेळीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत आता भारताचा इंग्लंडबरोबर सामना होणार आहे.

आज झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने 36 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची दाणादाण उडविली. हरमनप्रीत कौरने 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 171 धावांची तुफान खेळी केली. दरम्यान, या सामन्यात भारताने दिलेल्या 282 धावांचा पाठलाग करताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळती झाली. ठराविक धावांच्या अंतराने ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले. फलंदाज अॅलेक्स ब्लॅकवेलने सर्वाधिक 90 धावांची खेळी केली. मात्र ती अपयशी ठरली. तर संघाची कर्णधार मेग लेनिग अवघ्या शून्य धावेवर तंबूत परतली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताकडे पाहून अनेक विकसनशील देशही प्रभावित झाले आहेत !

swarit

आपचे २० आमदार राष्ट्रपतीकडून अपत्रा

swarit

Republic Day | मुंबईत रंगणार नौका नयन स्पर्धा

News Desk