HW News Marathi
देश / विदेश

भारत-इस्राइल लढणार दहशतवाद्यांविरोधात

जेरूसलेम(वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्रायल दौºयावर आहेत. अंतराळ, कृषी आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्यासाठी उभयंतात १७ हजार कोटींचे एकूण सात करारावर स्वाक्षºया झाल्या. दरम्यान, गंगा स्वच्छतेसाठी इस्रायलने भारतासोबत करार केला आहे.

भारत आणि इस्रायल औद्योगिक क्षेत्रातील संधोधन आणि विकासासाठी एकमेकांना सहकार्य करणार आहे. यासोबतच पिण्याचे पाणी आणि स्वच्छता क्षेत्रातही सहकार्य करार करण्यात आला आहे. अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांपासून भारत आणि इस्रायलकडून एकमेकांना सहकार्य केले जाते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असणाºया गंगा स्वच्छतेसाठी इस्रायल महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे.

भारत आणि इस्रायलमधील द्विपक्षीय करारांमुळे जागतिक स्तरावर स्थैर्य आणि शांतता राखण्यास मोठी मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करारावर स्वाक्षरी केल्यावर म्हटले. जलसंधारण, कृषी या क्षेत्रांसह अनेक क्षेत्रांमध्ये नवनवे उपक्रम राबवण्यात इस्रायल संपूर्ण जगात आघाडीवर आहे. भारत आणि इस्रायल यांचा लोकशाहीवर विश्वास असून हे दोन्ही देश अर्थव्यवस्थेत भरारी घेत आहेत,असेदेखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. भारताला हिंसा आणि दहशतवादाचा अनेकदा फटका बसला आहे. इस्रायललादेखील दहशतवादाचा फटका बसला आहे. दोन्ही देशांमधील कट्टरतावादाविरोधात लढण्याचा संकल्प आम्ही केला, असेदेखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी भाषण संपताना इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना सपत्नीक भारतात येण्याचे आमंत्रण दिले. विशेष म्हणजे नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणाचा लगेचच स्वीकार केला.

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी भारत आणि इस्रायलच्या गाठी या स्वर्गात बांधल्या गेल्या आहेत, असे म्हणत दोन्ही देशांच्या संबंधावर भावनिक भाष्य केले. ह्यभारतासोबत सहकार्य करार करताना माझे हृदय भरून आले आहे. आम्ही दोन देश म्हणून इतिहास रचत आहोत. दोन्ही देशांना दहशतवादाचा फटका बसला असून या क्षेत्रात आम्ही एकमेकांना सहकार्य करणार आहोत, असे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटले.

https://www.facebook.com/mahabatmi365/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

News Desk

तीन वर्षाच्या मुलाची दहशतवादी हल्ल्यापासून केली सुटका

News Desk

शेअर बाजार १२०० अंकाने कोसळला

News Desk