HW News Marathi
देश / विदेश

मोबाइलसाठी मेजरला झाडल्या गोळ्या, सिमेवर जवानाकडून धक्कादायक कृत्य

जम्मू काश्मीर- मोबाइल संच आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. काही काळ जरी मोबाइल बंद राहिला किंवा त्यावरील मेसेज वाचता आले नाही तर माणूस अस्वस्थ होतो. यातून तो कुठेलेही पाऊल उचलू शकतो, याचाच प्रत्यय जम्मू काश्मीर परिसरातील सिमेवरील या घटनेतून आला आहे. मोबाइल हिसकावून घेतल्याचा राग आल्याने लष्करातील एका जवानाने आपल्या वरिष्ठाला चक्क गोळ्या घालून ठार केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला.

उरी सेक्टरमध्ये राष्ट्रीय रायफल्सच्या एका जवानाने आपल्याच तुकडीतील वरिष्ठ अधिकाऱ्याचा गोळ्या झाडून खून केला आहे. शिखर थापा असे मृत अधिकाऱ्याचं नाव असून ते ‘मेजर’ पदावर कार्यरत होते. थापा यांनी आरोपी जवानाला कर्तव्यावर असताना मोबाइल वापरल्याबद्दल जाब विचारला होता. पुन्हा असे झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर थापा यांनी आरोपी जवानाचा मोबाइल जप्त केला होता. जप्तीच्या काळात मोबाइलचं थोडंफार नुकसान झाल्याचं सांगितलं जातं. त्याचाच राग मनात धरून त्यानं थापा यांच्यावर गोळ्या झाडल्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ayodhya Verdict : जाणून घ्या… कोण आहेत हे ३ मध्यस्थी जे काढतील तोडगा

News Desk

ब्रिक्समध्येही ‘सबका साथ, सबका विकास’

News Desk

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर नाराज

News Desk