HW News Marathi
देश / विदेश

मीरा कुमार यांना काँग्रेसकडून राष्ट्रपतीपदाची उमेदवारी

नवी दिल्ली – सत्ताधारी भाजपनं रामनाथ कोविंद यांच्यारूपानं दलित समाजाला उमेदवारी दिली. त्यावर काँग्रेसप्रणीत यूपीएनं अपेक्षेप्रमाणं माजी लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळं अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र, मतांची गोळाबेरीज केल्यास कोविंद यांचं पारडं जड मानलं जातंय.

मीरा कुमार दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्या माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. मीरा कुमार या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधल्या एक आहेत. त्यांनी बिहार राज्यातून लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात मीरा कुमार यांनी लोकसभेचं अध्यक्षपदही भूषवलं आहे. लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची 3 जून 2009 रोजी बिनविरोध निवड झाली होती.

मीरा कुमार या 1973मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्या. त्यांनी अनेक देशांची भ्रमंती केली आहे. त्यांच्या मातोश्री या स्वातंत्र्य सेनानी होत्या. लोकसभेवर त्या पाच वेळा निवडून गेल्या आहेत. त्या पेशानं एक वकील आणि मुत्सद्दी राजकारणी असून, 8व्या, 11व्या, 12व्या, 14व्या आणि 15व्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपदही भूषवलं आहे.

तर मीरा कुमार यांचे प्रतिस्पर्धी रामनाथ कोविंद 23 जूनला उमेदवारी अर्ज भरतील. ‘रामनाथ कोविंद मूळ उत्तर प्रदेशमधील कानपूरचे असून दलित प्रवर्गातले आहेत. संघर्ष करुन रामनाथ कोविंद आज या पदापर्यंत पोहोचले आहेत. रामनाथ कोविंद 12 वर्ष राज्यसभा सदस्य होते. उत्तर प्रदेशचे महासचिवदेखील होते’. अशी माहिती अमित शहा यांनी दिली आहे. ‘नाव ठरण्याआधी आम्ही देशातील सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. नाव ठरल्यानंतर एनडीएतील सर्व घटकपक्षांना कळवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याशी बातचीत करत नाव कळवलं’, असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Koregaon Bhima Violence | पाचही आरोपींना नजरकैद

News Desk

welcome2019 : देशासह जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

News Desk

भारतात घुसखोरी करण्यासाठी ३०० दहशतवादी प्रयत्नशील | लष्करप्रमुख

News Desk